भजनी मालिका
← भजनांकडे परत

शास्त्रज्ञ पंडित तो एक मी मानी । आपणातें देखोनी तन्मय झाला

shastradnya pandit to ek mi mani | apanaten dekhoni tanmay jhala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
शास्त्रज्ञ पंडित तो एक मी मानी । आपणातें देखोनी तन्मय झाला ॥१॥ येरां माझें नमन सर्व साधारण । ग्रंथांचें रक्षण म्हणोनियां ॥२॥ वेद पारायण मानीं तो ब्राह्मण । चित्त समाधान संतुष्ट सदा ॥३॥ पुराणिक तो होऊनि कृतार्थ । विषयीं विरक्त विधि पाळी ॥४॥ मानीं तो हरिदास ज्या नामीं विश्वास । सर्वस्वें उदास देहभावा ॥५॥ नामा ह्मणे ऐसे भेटवीं विठ्ठल । त्यालागीं फुटला कंठ माझा ॥६॥