भजनी मालिका
← भजनांकडे परत

शरीर निर्मळ वासना टवाळ

sharir nirmal vasana taval

रचनाकार: संत सोपान · अभंग
शरीर निर्मळ वासना टवाळ । का रे तु वरळ भक्तिविण ।।१।। सर्व ब्रह्म हरि नेणसि सोवळे । एकाचि गोपाळे जन वन ॥२॥ आप पृथ्वी तेज वायो व्योम । पंचभूती सम वर्ततसे ॥३॥ सोपान म्हणे गुरूचा उपदेश शुद्ध । तरीच वासना प्रबुद्ध तया नरा ॥४॥