भजनी मालिका
← भजनांकडे परत

शरण आलों नारायणा। आतां हो पावना

sharan alon narayana| atan ho pavana

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
शरण आलों नारायणा। आतां हो पावना ॥१॥ शरण आला मारुतिराया त्याची दिव्य केली काया ॥२॥ शरण प्रल्हाद तो आला। हिरण्यकश्यपू मारिला ॥ ३॥ जनी म्हणे देवा शरण व्हावें भल्यानें जाणोन ॥४॥