भजनी मालिका
← भजनांकडे परत

शांतिक्षमादया निवती निर्विग

shantikshamadaya nivati nirvig

शांतिक्षमादया निवती निर्विग । होउनी सर्वांग आत्मभोगी ॥१॥ नाहीं अंतरुप सर्वही चैतन्य । चिदानंदघन बिंबलेंसे ॥२॥ मायीकवृत्तीचा झणी धरिसी संग । इंद्रियाचा पांग सांडी रया ॥३॥ ज्ञानदेव म्हणे कल्पना काजळी । दिपीं दीपमेळीं पाजळी वो जगीं ॥४॥