भजनी मालिका
← भजनांकडे परत

सेवेलागीं सेवक जालों । तुमच्या लागलों निज चरणा

sevelagin sevak jalon | tumachya lagalon nij charana

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सेवेलागीं सेवक जालों । तुमच्या लागलों निज चरणा ॥१॥ अहो स्वामी तुकयादेवा । यावरी न करावा अव्हेर ॥२॥ सहज लीळे उदकीं वह्या । तुम्ही रक्षिलीया निजसत्तें ॥३॥ निळा म्हणे धराल हातीं । तरी दयाल मति निरुपम ॥४॥