भजनी मालिका
← भजनांकडे परत

सत्यसंकल्पाचा कर्ता जो विश्वाचा । अनाथ जीवांचा मायबाप

satyasankalpacha karta jo vishvacha | anath jivancha mayabap

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सत्यसंकल्पाचा कर्ता जो विश्वाचा । अनाथ जीवांचा मायबाप ॥१॥ पुंडलिकें तया आणिलें रंगणीं । कटावरी पाणि ठेवूनियां ॥२॥ अणुरेणुमाजि व्यापूनि राहिला । आनत्व जाहला एकलचि ॥३॥ नामा ह्मणे वेद त्यालागीं बोभाय । जोडोनियां पाय उभा ठाके ॥४॥