भजनी मालिका
← भजनांकडे परत

साती बारी दोन्ही आपणचि होऊनि । सुरतरु माझारी वोळगे

sati bari donhi apanachi houni | surataru majhari volage

साती बारी दोन्ही आपणचि होऊनि । सुरतरु माझारी वोळगे ॥ तळीं त्रिभंगी मांडूनि ठाण घेऊनि मेघाचें मान । विजु एकी वेढुन बरवे गर्जतुगे माये ॥१॥ नवलावोगे माये न्याहाळितां कैसे मनाचे नयन उमलताती ॥ तीही एक दृष्टि जिव्हा लाभती तरी । सुलभु देखतां बोलतीगे माये ॥ध्रु०॥ पाहो याचे पाय । शंभूचिया माथां माये । सासिन्नली चंद्रदाहें गंगेतें ॥ तेथ असुराची शिरें । येथे सकळ शरीरें । तोडराचेनि बडिवारें । बरीजतुगे माये ॥२॥ तेज सांवळें । रुप लाधलें परिमळें । अनंगाचेनि सळें । कासीं कासियेला ॥ तो पालउ पांढर गळे । होतुकां जगाचे डोळे । दुरुनियां सुनिळें । रोविलेंगे माये ॥३॥ उपनिषदाचा गाभा । माजी सौंदर्याची शोभा । मांडिला दोखांबा । तैसा दिसे देखा ॥ वेगळालिया कुंभस्थळा । परि हातु सरळा । पालटु बांधला माळा । मेखळा मिसेंगे माये ॥४॥ भलतेउते वाहे न वाहे नदी । जेंवीं स्थिरावे अगाधीं । तैसी पुंजालता हे मंदी । दोही वेदांची ॥ वरिलिया वक्षस्थळा । नुपुरे स्थानीचा डोळा । मागुन निघे कमळा । नव्हे रोमराजी ॥५॥ लावण्य उदधी वेळा । तेंचि पै वैजयंती माळा । वरी शोभतसे सोहळा । साहकारवेचा ॥ म्हणे प्रेम पुष्कळा । थडिये लाभे सकळा । नयनसुखाच्या सुकाळा । जग मेळवितुगे माये ॥६॥ भोंवतीं तारागणें पुंजु । मांजी अचळ सुरिजु । आला वक्षस्थळा उजु । तैसा दिसे देखा ॥ जेवणे न अंगें । उभऊनि श्रीकरायोगें । योगनादातटी रंगे । नभु दुमदुमितवो माये ॥७॥ इंद्रधनुष्य काढिलें । तया तळीं बहुडलें । तेचि कुरुळीं वेढिलें । समाधिसुख देखा ॥ आवारीचा गुणु । श्रुतीगर्भी समवर्णु । दोही स्वरीं गोडी वेणु । जग निववीतुवो माये ॥८॥ या वेधितां कांहींच नुरे । रुपा आले हेंचि खरें । वरी दाविता हे माजिरें । गोपवेशाचें ॥ तमावरी हातियारे । रविकाज काईयेरे । तैसा रखुमादेविवरें । विरें घेतलेंगे माये ॥९॥