भजनी मालिका
← भजनांकडे परत

सातवा जो गर्भ योगमाया नेत । आश्चर्य करीत मनामाजी

satava jo garbha yogamaya net | ashcharya karit manamaji

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सातवा जो गर्भ योगमाया नेत । आश्चर्य करीत मनामाजी ॥१॥ रोहिणी उदरीं नेवोनी घातला । न कळे कोणाला देवावीण ॥२॥ कंसाचिया भेणें यादव पळाले । ब्राह्मण राहिले अरण्यांत ॥३॥ नाहीं कोणा सुख तळमळ मानसीं । वधील दुष्टांसी कोण आतां ॥४॥ विश्वाचा जो आत्मा कळलें तयाला । दावितसे लीला संभूतींची ॥५॥ अहर्निशीं ध्यान भक्तांचे मानसीं । स्थापील धर्मासी नामा ह्मणे ॥६॥