भजनी मालिका
← भजनांकडे परत

सात पांच तीन दशकांचा मेळा

sat panch tin dashakancha mela

सात पांच तीन दशकांचा मेळा । एकतत्त्वीं कळा दावी हरी ॥१॥ तैसें नव्हे नाम सर्वमार्गा वरिष्ठ । तेथें कांहीं कष्ट नलगती ॥२॥ अजपाजपणें उलट प्राणाचा । तेथे ही मनाचा निर्धारु असे ॥३॥ ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ । रामकृष्णी पंथ क्रमीयेला ॥४॥