भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वव्यापक सर्वदेहीं आहे

sarvavyapak sarvadehin ahe

सर्वव्यापक सर्वदेहीं आहे । परि प्राणियासि सोय नकळे त्याची ॥१॥ परमार्थ तो कडु विषय तो गोडु । तया अवघडु संसार ॥२॥ नामाचें साधन जिव्हे लावी बाण । तया अनुदिनीं जवळी वसे ॥३॥ धारणा धीट जरि होय विनट । तया प्रेमें वैकुंठ जवळी असे ॥४॥ सुलभ आणि सोपारें केलेंसे दातारें । आम्ही एकसरें उच्चारिलें ॥५॥ ज्ञानियासि ज्ञान ज्ञानदेवि ध्यान । कलिमळ छेदन नाम एक ॥६॥