भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वस्वरूप नाम राम सर्व घनःश्याम

sarvasvarup nam ram sarva ghanahshyam

सर्वस्वरूप नाम राम सर्व घनःश्याम । तो गोकुळीं आत्माराम दुध मागे ॥१॥ भाग्येंविण दुभतें दैव उभडतें । नंदाघरीं आवडते घरीं खेळे ॥२॥ मंजुळ वेणु वाजें लुब्धल्या धेनुवा । नंदाघरीं दुहावा पूर्ण वाहे ॥३॥ घरोघरीं दुभतें गौळियां परिपूर्ण । यशोदा ते आपण गोरस घुसळी ॥४॥ गोपाळ हरिखु नंदा यशोदे देख । गौळियां कौतुक करिती हरि ॥५॥ निवृत्ति गयनी देव उपदेशिला सर्व । गोरक्ष गुह्म भाव सांगति मज ॥६॥