भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वांमाजीं सार नाम हें देवाचें । सर्व साधनांचे सार जें कां

sarvammajin sar nam hen devachen | sarva sadhananche sar jen kan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सर्वांमाजीं सार नाम हें देवाचें । सर्व साधनांचे सार जें कां ॥१॥ चार साहा आणिक आठरा वर्णिती । नामें निजप्राप्ती अर्धक्षणीं ॥२॥ व्यासादिक नाम साधियलें दृढ । प्रपंच काबाड निरसेल ॥३॥ नामदेव म्हणे निजधाम ब्रह्म । घेतां नेम धर्म सर्व साधे ॥४॥