भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वांभूतीं हरी आहे हेंचि साच । मायाजाळ न छळे भाविकांसी

sarvambhutin hari ahe henchi sach | mayajal na chhale bhavikansi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सर्वांभूतीं हरी आहे हेंचि साच । मायाजाळ न छळे भाविकांसी ॥१॥ सर्व ब्रह्म ऐसे वेद बोले गाढा । ब्रह्मींचा पवाडा अगम्य तो ॥२॥ जाणतां नेणताम हरीनाम उच्चार । मार्ग तो साचार सुफल सदा ॥३॥ नामा म्हणे कारण जिव्हा होय स्मरण । सर्व नारायण हरी दिसे ॥४॥