भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वकाळ पुण्याच्या राशी । हरिनाम आलिया जिव्हेसी

sarvakal punyachya rashi | harinam aliya jivhesi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सर्वकाळ पुण्याच्या राशी । हरिनाम आलिया जिव्हेसी । नित्य तप अनुष्ठानाच्या राशी । कोटी यज्ञासी लाभ जाला ॥१॥ धन्य धन्य त्याचा वंश । जे जे रतले नामास । रामनामीं नित्य सौरस । ते विष्णुदास पवित्र ॥२॥ पवित्र ते स्वधर्मीं । ज्यांसी सर्वकाळ नामीं । तयाचें नाम पूर्णकामी । मनोरथ पुरतील ॥३॥ नामा जपे नाम हरीचें । सार्थक केलें संसाराचें । ओझें फेडिलें पूर्वजन्माचें । हरीस्मरण केलिया ॥४॥