भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वकाळ हरी जप । हेंचि तपामाजीं तप

sarvakal hari jap | henchi tapamajin tap

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सर्वकाळ हरी जप । हेंचि तपामाजीं तप । न लागती घालावे संकल्प । नाना मंत्राचे परियेसी ॥१॥ मंत्रामाजीं मंत्रसार । रामकृष्ण हाचि उच्चार । नित्यानित्य निर्विकार । हाचि जोडेल साचा रे ॥२॥ मागें कृतायुगीं सांगों । त्रेतायुगीं काय ओळगों । द्वापारीं कृष्णरंगे रंगो । परी कलीमाजी नामतारक ॥३॥ नामा म्हणे ग्रंथीं । पाहे पा यथा निगुती । नाम जपतांची तरती । हें व्यासाचें वचन ऐसें ॥४॥