भजनी मालिका
← भजनांकडे परत

सारसार दोन्ही । न दिसती नयनीं । अवचिता गगनीं । बिंबलासे

sarasar donhi | na disati nayanin | avachita gaganin | bimbalase

सारसार दोन्ही । न दिसती नयनीं । अवचिता गगनीं । बिंबलासे ॥१॥ लोपले रविशशि । तेज न माये आकाशीं । मेघ:श्याम मेघाशीं । लपविलें ॥ध्रु०॥ दिव्यरुप तेज । तीव्र ना तेजबीज । कुंडलि विराजे । लोपलें सूर्यो ॥२॥ ज्ञानदेवा ध्यान । मनाचेंही मन । हरिचरण स्थान । दृढ केलें ॥३॥