भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतप्रसाद लाधले । तेचि धाले ब्रम्हारसे

santaprasad ladhale | techi dhale bramharase

रचनाकार: संत निळोबा · अभंग
संतप्रसाद लाधले । तेचि धाले ब्रम्हारसे ॥१॥ सदा नामीं जडली प्रीति । तेचि करिता उच्चार ॥२॥ भक्ति भाग्य वोसंडलें । वैराग्य आलें मोडोनी ॥३॥ निळा म्हणे अंगी शांति । क्षमा विश्रांति ज्ञानाची ॥४॥