भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसारींच्या आह्या आहाळलों भारी । निवावी गा श्रीहरि अमृतदृष्टी

sansarinchya ahya ahalalon bhari | nivavi ga shrihari amrutadrushti

रचनाकार: संत नामदेव · अभंग
संसारींच्या आह्या आहाळलों भारी । निवावी गा श्रीहरि अमृतदृष्टी ॥१॥ मी अनाथ अपराधी दुर्बळ दुराचारी । कृपाळू बा हरी तारीं मज ॥२॥ नामा म्हणे विठो कृपेचा कोंवळा । जाणसी कळवळा अनाथनाथा ॥३॥