भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसारसातें आलों मी पाहुणा

sansarasaten alon mi pahuna

संसारसातें आलों मी पाहुणा । दिसे दोन्ही आनंदा पाहवयासी ॥१॥ तव त्याचे तेजें झडपिलें मज । मजमाजि काज होऊनि ठेलें ॥२॥ चित्त जव निवडी तव आपणहि पळे । अवचितें जवळ येतु असे ॥३॥ जाऊं पाहे परता तव नेतु असे पंथा । वैकुंठीच्या कथा आपण सांगे ॥४॥ एकरुप दिसे तव सभोंवता आपण । अवघा नारायण अवघा नारायण ज्ञानदेवा ॥५॥