भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसारसंकटें रिघालों पाठिसी । आतां झणीं देसी त्यांचे हातीं

sansarasankaten righalon pathisi | atan jhanin desi tyanche hatin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
संसारसंकटें रिघालों पाठिसी । आतां झणीं देसी त्यांचे हातीं ॥१॥ ब्रीदें बडिवार ऐकोनियां फार । रिघों आम्ही द्वार विठोबाचें ॥२॥ आणिकहि वार्ता सांगों काय आतां । पंढरिच्या नाथा परिसावें ॥३॥ अमृत पाजणें प्रीतीनें भक्तासी । सत्य ह्रषिकेशी नामा म्हणे ॥४॥