भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसारसागरीं पडलों महापुरीं । सोडवण करी देवराया

sansarasagarin padalon mahapurin | sodavan kari devaraya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
संसारसागरीं पडलों महापुरीं । सोडवण करी देवराया ॥१॥ नामाची सांगडी देऊनियां मातें । वैकुंठावरूतें नेऊनि घाली ॥२॥ काम क्रोध मगर करिती माझा ग्रास । झणीं तूं उदास होसी देवा ॥३॥ नामा म्हणे देवा झणीं मोकलिसी मातें । नाम तुझें सरतें धरिलें एक ॥४॥