भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसारसागर भरला दुस्तर । विवेकी पोहणार विरला अंत

sansarasagar bharala dustar | viveki pohanar virala ant

रचनाकार: संत नामदेव · अभंग
संसारसागर भरला दुस्तर । विवेकी पोहणार विरला अंत ॥१॥ कामाचिया लाटा अंगीं आदळती । नेणों गेले किती पाहोनियां ॥२॥ भ्रम हा भोंवरा फिरबी गरगरा । एक प-डिले धरा चौर्‍यांशींच्या ॥३॥ नावाडया विठ्ठल भवसिंधु तारूं । भक्तां पैलपारू उतरीतो ॥४॥ नामा म्हणे नाम स्मरा श्रीरामाचें । भय कळिकाळाचें नाहीं तुह्मां ॥५॥