भजनी मालिका
← भजनांकडे परत

संकल्पाचा मळु नेत्रीं नीडारला । त्यालागीं तो डोळा काय दिसे

sankalpacha malu netrin nidarala | tyalagin to dola kay dise

रचनाकार: संत नामदेव · अभंग
संकल्पाचा मळु नेत्रीं नीडारला । त्यालागीं तो डोळा काय दिसे ॥१॥ जेथें देखों तेथें तोचि तो कोंदला । विश्वामाजी भरला विश्वंभर ॥२॥ मोठे थोर थोर तापसी नाडीले । कामानें वोढिले माघौतेची ॥३॥ वेदाचें पुनीत यज्ञशीळ सारें । झकवती बारे वास नेणे ॥४॥ दांभीक मगरीं गीळिलें सर्वांसीही । त्यालागीं तो नाहीं ऐसा भासे ॥५॥ नामा म्हणे ऐसी बोलली जननी । बाळ मोठा ज्ञानी जाणवला ॥६॥