भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांडोनि संसार जालों मी अंकित । ऐशियाचा अंत पाहूं नको

sandoni sansar jalon mi ankit | aishiyacha ant pahun nako

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सांडोनि संसार जालों मी अंकित । ऐशियाचा अंत पाहूं नको ॥१॥ पातकी मी सत्य पातकी मी सत्य । पातकी मी सत्य पांडुरंगा ॥२॥ माझे गुणदोष न धरिसी चित्तीं । थोरपण ख्याति दावी आम्हां ॥३॥ ऐसा अपराध आणूं नको मना । पंढरीच्या राणा म्हणे नामा ॥४॥