भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांडोनि अभिमान जालों शरणागत । ऐसियाचा अंत पहासी काई

sandoni abhiman jalon sharanagat | aisiyacha ant pahasi kai

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सांडोनि अभिमान जालों शरणागत । ऐसियाचा अंत पहासी काई ॥१॥ माझे गुणदोष मनीं गा न धरीं । पतित पावत जरी म्हण्नविसी ॥२॥ पडविलिया पापराशी झणीं देसी देवा । हे लाज केशवा कोणास जी ॥३॥ नामा म्हणे देवा चतुरा शिरोमणी । निकुरा जासी झणीं मायबापा ॥४॥