भजनी मालिका
← भजनांकडे परत

सण दिवाळीचा आला नामा राउळासी गेला

san divalicha ala nama raulasi gela

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
सण दिवाळीचा आला नामा राउळासी गेला ॥१॥ हातीं धरूनी देवासी चला आमुच्या घरासी ॥२॥ देव तेथुनी चालिले नामयाच्या घरा आले ॥ ३॥ गोणाईनें उटणें केलें दामाशेटीनें स्नान केलें ।।४।। पदर काढिला माथ्याचा बाळ पुशिला नंदाचा ||५|| हातीं घेउनी पंचारती । चक्रपाणी ओवाळती ||६|| जेऊनियां तृप्त झाले। दासी जनीनें विडे दिले ।।७॥