भजनी मालिका
← भजनांकडे परत

सम्यक करी शांति बैसे एके पातीं

samyak kari shanti baise eke patin

सम्यक करी शांति बैसे एके पातीं । क्षेमेसि निवृत्ति वाड करी ॥१॥ ऐसा हा उपदेश सखी सांगे जीवास । झणी कासावीस होसी बाई ॥२॥ सज्ञानी विज्ञान त्रिज्ञानीं नारायण । अन्ययीं शोधून पाहे लक्षीं ॥३॥ ज्ञानदेवीं शिवा उन्मनि रिघावा । हरीचा विसावा सर्वांघटीं ॥४॥