भजनी मालिका
← भजनांकडे परत

समुद्रांत पुत्र बुडाला रे माझा । पराक्रम तुझा ठावा असे

samudrant putra budala re majha | parakram tujha thava ase

रचनाकार: संत नामदेव · अभंग
समुद्रांत पुत्र बुडाला रे माझा । पराक्रम तुझा ठावा असे ॥१॥ अवश्य म्हणोनी तेथोनी निघाले । समुद्रांत आले राम-कृष्ण ॥२॥ करोनियां पूजा पुसे वर्तमान । देईंरे आणून गुरुपुत्र ॥३॥ पांचजन्य दैत्य येथें बळी राहे । बंधु तेथें पाहे कृष्णनाथा ॥४॥ टाकोनियां उडी वधिलें तयासी । पाहे ह्लषिकेशी उदरांत ॥५॥ नाहीं ऐसें कळों आलें तें ईश्वरा । घेवोनी शरीरा आला ॥६॥ परीक्षिती काय न कळे तयाला । दावीतसे लीला नामा म्हणे ॥७॥