भजनी मालिका
← भजनांकडे परत

समुदाय काय सांगों श्रीरामाचा

samuday kay sangon shriramacha

रचनाकार: संत रामदास · अभंग
समुदाय काय सांगों श्रीरामाचा । ‌अंतरी कामाचा लेश नाही लेश नाही तया बंधु भरतासी ।‌ सर्वही राज्यासी त्यागियेले त्यागियेले अन्न केले उपोषण ‌‌। धन्य लक्ष्मण ब्रह्मचारी ब्रह्मचारी धन्य मारुती सेवक‌ । श्रीरामी सार्थक जन्म केला जन्म केला धन्य वाल्मीकी ऋषीने । धन्य ती वचने भविष्याची भविष्य पाहता धन्य बिभीषण राघवी शरण । सर्व भावे सर्व भावे सर्व शरण वानर‌‌ धन्य ते अवतार । विबुधांचे विबुधां मंडण राम सर्व गुण‌‌ ‍‌‌अनन्य शरण रामदास ।