भजनी मालिका
← भजनांकडे परत

साकारु निराकारु वस्तु सदगुरु आमुचा

sakaru nirakaru vastu sadaguru amucha

साकारु निराकारु वस्तु सदगुरु आमुचा । तेणें या देहाचा केला उगऊ ॥१॥ उगविलें मायेतें निरशिलें । एकतत्त्व दाविलें त्रिभुवन रया ॥२॥ सत्रावी दोहोनी इंद्रिया सौरसु । गुरुमुखें उल्हासु भक्ति महिमें ॥३॥ ज्ञानदेव म्हणे मी नेणतां प्रपंच । तोडली मोहाची पदवी आम्हीं ॥४॥