भजनी मालिका
← भजनांकडे परत

साकार निराकार ब्रह्मीचे विकार

sakar nirakar brahmiche vikar

साकार निराकार ब्रह्मीचे विकार । तेथील अंकुर गुरुराज ॥ १ ॥ रज तम नाहीं सात्विक तेही । परिपूर्ण देहीं आत्माराम ॥ २ ॥ सर्वघटवासि सर्वत्रनिवासी । आपण समरसीं बिंबलासें ॥ ३ ॥ निवृत्तिची खुण गुरूचा उद्गार । सर्व हा निर्धार आत्माराम ॥ ४ ॥