भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळांचिया नेत्रें तुम्हां सर्वही देखणें । सकळांचिया श्रोत्रें तुम्हां सर्वही ऐकणें

sakalanchiya netren tumhan sarvahi dekhanen | sakalanchiya shrotren tumhan sarvahi aikanen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सकळांचिया नेत्रें तुम्हां सर्वही देखणें । सकळांचिया श्रोत्रें तुम्हां सर्वही ऐकणें ॥१॥ ऐसे सर्वज्ञची तुम्हीं सर्वदा देवा । जेथिल तेथें ज्याच्या तैशा जाण तसा भावा ॥२॥ सकळांच्याही रसना सर्वही रस सेवितां । सकळांच्याही चरणें लंघुनी जातां दिगंता ॥३॥ निळा म्हणे सकळांच्याही जीवाचें जीव । होऊनियां अलिप्त शेखी रुप ना नांव ॥४॥