भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळ साधनांचे सार । रामकृष्ण हा उच्चार

sakal sadhananche sar | ramakrushna ha uchchar

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सकळ साधनांचे सार । रामकृष्ण हा उच्चार ॥१॥ म्हणा गोविंद नरहरी । सकळ जीवां तोचि तारी ॥२॥ नाम घेतां हरी माधव । तरताती सकळ जीव ॥३॥ नामा म्हणे केशव वाचे । धन्य जीवित वैष्णवांचें ॥४॥