भजनी मालिका
← भजनांकडे परत

सहसमुदायेंसी उठावें शारंगधरा । हरिहरेश्वरा जाऊं आतां

sahasamudayensi uthaven sharangadhara | harihareshvara jaun atan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सहसमुदायेंसी उठावें शारंगधरा । हरिहरेश्वरा जाऊं आतां ॥१॥ उठले विष्णव आणि ह्रषिकेशी । आले त्र्यंबकासी निवृत्तिराज ॥२॥ एकादशी व्रत वद्य ज्येष्ठ मासीं । उत्सव निवृत्तीसी देवें केला ॥३॥ द्वादशीं पारणें सोडिती वैष्णव । समारंभ देव करितसे ॥४॥ राहिली ते शक्ति गळालें शरीर । देह अहंकार त्यागियेला ॥५॥ कोणाची करावी पूजा कोणें कोणा । अवघेअ नारायणा करणें येथें ॥६॥ नामा म्हणे देवा मुक्ताईची गती । सांडिलें निवृत्ति शरीरासी ॥७॥