भजनी मालिका
← भजनांकडे परत

सागरीचे सोय जगा निवारीत

sagariche soy jaga nivarit

रचनाकार: संत सोपान · अभंग
सागरीचे सोय जगा निवारीत । मागुते भरीत पूर्णपणे ।। १॥ तैसे आम्ही दास तुज माजी उदास । तू आमुचा निवास सर्व देवा ॥२॥ तुजमाजी विरो सुखदुः विसरो । तुझ्यानामे तरो येची जन्मी ।।३।। सोपान निकट बोलोनी सरल । तुष्टला गोपाळ अभय देत ॥४॥