भजनी मालिका
← भजनांकडे परत

सज्ञानीं पाहातां अज्ञान तत्त्वतां

sadnyanin pahatan adnyan tattvatan

सज्ञानीं पाहातां अज्ञान तत्त्वतां । अज्ञानीं अमृता सदगुरु जाणे ॥१॥ गुरुगम्य सत्ता शिष्य होय सरता । पूर्णी पूर्ण हातां ब्रह्म येत ॥२॥ आदि मध्य घर हरीचा शेजार । हरिविण थार नाहीं कोठें ॥३॥ ज्ञानदेवीं चित्त गुरु धर्म वित्त । अवघें जीवित हरि केला ॥४॥