भजनी मालिका
← भजनांकडे परत

साधु बोध झाला तो निरोनिया ठेला

sadhu bodh jhala to nironiya thela

साधु बोध झाला तो निरोनिया ठेला । ठायींच मुराला अनुभव ॥१॥ कापुराची वाती उजळली ज्योति । ठायीच समाप्ती झाली जैशी ॥२॥ मोक्ष रेखें आला भाग्यें विनटला । साधूंचा अंकिला हरिभक्त ॥३॥ ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनीं । हरि दिसे जनीं वनीं आत्मतत्त्वीं ॥४॥