भजनी मालिका
← भजनांकडे परत

साधु आणि संत । जन्म द्यावा जी कलींत

sadhu ani sant | janma dyava ji kalint

रचनाकार: संत नामदेव · अभंग
साधु आणि संत । जन्म द्यावा जी कलींत ॥१॥ मागणें तें हेंचि देवा । कृपा करीं हो केशवा ॥२॥ संत दयाळ परम । तया साक्षी नारायण ॥३॥ जनी म्हणे ऐसे साधु । तयापाशीं तूं गोविंदू ॥४॥