भजनी मालिका
← भजनांकडे परत

साधावया स्वरुपसिद्धि । सिद्ध साधक समाधी

sadhavaya svarupasiddhi | siddha sadhak samadhi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
साधावया स्वरुपसिद्धि । सिद्ध साधक समाधी । बैसोनी ध्यानबुद्धि । परी तो हरी न सांपडे ॥१॥ धन्य धन्य वैष्णव संग । अखंड तेथें पांडुरंग । कीर्तनी नाचतसे अभंग । अखंड काळ सर्वदा ॥२॥ नाम घेतां धांवे विठठल । नलगे तप नलगे मोल । कष्ट न लगती बहुसाल । हा कृपाळु दीनाचा ॥३॥ नामा म्हणे भक्तीचें कारण । भक्तीसी तुष्टे नारायण । याचें करितां कीर्तन । आपेंआप तुष्टेल ॥४॥