भजनी मालिका
← भजनांकडे परत

साधन साधितां होताती आपदा । म्हणोनि गोविंदा स्मरे कां रे

sadhan sadhitan hotati apada | mhanoni govinda smare kan re

रचनाकार: संत नामदेव · अभंग
साधन साधितां होताती आपदा । म्हणोनि गोविंदा स्मरे कां रे ॥१॥ कृष्णकथा सार सांगे कां सधर । तुटेल येरझार जन्ममरणा ॥२॥ निष्फळ निखळ भावीं तूं सफळ । भजन केवळ सर्वांभूतीं ॥३॥ नामा म्हणे भक्ति होईल विरक्ति । तुटेल यातायाती जन्ममरण ॥४॥