भजनी मालिका
← भजनांकडे परत

राम सर्वोत्तम या नामे निखळ

ram sarvottam ya name nikhal

रचनाकार: संत सोपान · अभंग
राम सर्वोत्तम या नामे निखळ । जन हे सफळ दिसताहे ।।१।। भिन्न नाही दुजे सर्व आत्मराज । नाचताती भेज योगीराज ।।२।। माता पिता देव गृह दारा जन । सर्व जनार्दन सर्वा रूपी ॥३॥ सोपान खेचर ब्रह्म माजिवडे । ब्रह्मांडा एवढे आत्माराम ॥४॥