भजनी मालिका
← भजनांकडे परत

रखुमाई माता राही ओंवाळिती । नित्य पंचारती हरिच्या दासां

rakhumai mata rahi onvaliti | nitya pancharati harichya dasan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
रखुमाई माता राही ओंवाळिती । नित्य पंचारती हरिच्या दासां ॥१॥ नित्य भक्तां हरि यालागीं विनट । पंढरीची पेठ वसविली ॥२॥ धन्य हा निवृत्ति धन्य हा सोपान । धन्य हा निधान ज्ञानदेव ॥३॥ खेचर सांवता धनय जनमित्रा । यांसि सकळ देता हरि ब्रह्म ॥४॥ पांडुरंग पिसा यालागीं जाहला । मुक्ताई पाजिला प्रेम पान्हा ॥५॥ नामा म्हणे खूण जाणती सज्ञान । अखंड तें ध्यान निवृत्तिदेवीं ॥६॥ (५० सप्तश्रृंगालागीं केली प्रदक्षिणा । आतां नारायणा सिद्ध व्हावें ॥१॥ मार्गीं आदिमाया पूजिली आनंदी । म्हणती धन्य मांदी वैष्णवांची ॥२॥ चालतां चालतां दिवस जाले फार । होईल उशीर समाधीसी ॥३॥ तीन रात्र तेथें राहिले गोपाळ । मग म्हणती सकळ चला आतां ॥४॥ नामा म्हणे देव बैसले गरुडावर । उठावले भार वैष्णवांचे ॥५॥