भजनी मालिका
← भजनांकडे परत

राजाई तें पुसे अहो नामयाला करा जेवायला कांही यासीं

rajai ten puse aho namayala kara jevayala kanhi yasin

रचनाकार: संत राजाई · अभंग
राजाई तें पुसे अहो नामयाला करा जेवायला कांही यासीं ।। १ ।। प्रातःकाळी घरी सारूनि भोजन । आले ते चालून माझे भेटी ॥२॥ नामा म्हणें कांते दशमी एक भुक्ति भोजन निश्चिती करूं नये ||३|| उदईक हरिदिनी उपवास जागरण ऐकायें कीर्तन चार प्रहर।१४।। द्वादशी पारणें जालिया भोजन ऐकोनी पाहुणे चिंतातुर ।।५।। क्षुधातुर पोटीं निद्रा नलगे कांहीं । वर्षाएवढी पाही रात्र जाली ॥६॥