भजनी मालिका
← भजनांकडे परत

राजाई गोणाई । अखंडित तुझे पायीं

rajai gonai | akhandit tujhe payin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
राजाई गोणाई । अखंडित तुझे पायीं ॥१॥ मज ठेवियेलें द्वारीं । नीच ह्मणोनी बाहेरी ॥२॥ नारा गोंदा महादा विठा । ठेवियलें अग्रवाटा ॥३॥ देवा केव्हां क्षेम देसी । आपुली ह्मणोनी जनी दासी ॥४॥