भजनी मालिका
← भजनांकडे परत

राघवाचे दास सर्वस्वे उदास

raghavache das sarvasve udas

रचनाकार: संत रामदास · अभंग
राघवाचे दास सर्वस्वे उदास । तोडी आशापाश देवराणा देवराणा भाग्यें जालिया कैपक्षी । नाना परी रक्षी सेवकांसी सेवकासी कांहीं न लगे साधन । करीतो पावन ब्रीदासाठीं ब्रीदासाठीं भक्त तारिले अपार । आतां वारंवार किती सांगों किती सांगों देव पतितपावन । करावें भजन दास म्हणे।