भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुत्राचिया ओढी बाप करी जोडी । वाळवुनि कुरवंडी आपणा करी

putrachiya odhi bap kari jodi | valavuni kuravandi apana kari

रचनाकार: संत सेना · अभंग
पुत्राचिया ओढी बाप करी जोडी । वाळवुनि कुरवंडी आपणा करी ॥१॥ मिरासीचा धनी करुनी ठेविला। भार तो वाहिला कडिये खांदी ॥२॥ घाली अलंकार कौतुक डोळा पाहे। ठेवा दावी काय आहे तोचि ॥३॥ दुजियांनीं कोणी गांजितां तयासी । उदार जीवासी सेना म्हणे ॥४॥