भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूतना म्हणे भुकेला कान्हा । मग झडकरी उघडूनी लाविला स्तना । यशोदा म्हणे वो राजीवनयना । न सोसे दूध आणिकीचें

putana mhane bhukela kanha | mag jhadakari ughaduni lavila stana | yashoda mhane vo rajivanayana | na sose dudh anikichen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पूतना म्हणे भुकेला कान्हा । मग झडकरी उघडूनी लाविला स्तना । यशोदा म्हणे वो राजीवनयना । न सोसे दूध आणिकीचें ॥१॥ स्तनीं लागतांचि त्याचे वदन । विश तें अमृतसमान । शोषूनियां रक्त मांस-जीवन । पंचहि प्राण आकर्शिले ॥२॥ न सोसवे वेदना ते पूतने । म्हणे ओढीं ओढीं यशोदे तान्हें । ऐसें बाळ हें ही काय जाणें । वेंचले प्राण धांव धांव ॥३॥ तंव तो न सुटेचि सर्वथा । शिणल्या दासी परिचारिकाही ओडितां । नाना शब्दें आक्रंदतां । बिहालीं तत्वतां पळती लोकें ॥४॥ रक्त मांस अस्थींचे उदक । करुनियां चर्महि शोषियलें । देऊनियां सायुज्यसुखनीं स्थापियली ॥५॥ हें देखोनी दासी परिचारिका । भेणेंचि पळती अधो मुखा । जाऊनियां मथुरा लोंका । सांगती वार्ता रायसी ॥६॥ निळा म्हणे ऐकतां कानी । राजा चिंतावला बहुत मनीं । पुसे वर्तमान तया लागुनी । कैसे वर्तलें ते सांगा ॥७॥