भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुष्पक विमानातळीं । हरि उतरले भूतळीं

pushpak vimanatalin | hari utarale bhutalin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पुष्पक विमानातळीं । हरि उतरले भूतळीं । तंव उदयो पूर्वमेळीं । सूर्याचा जाला ॥१॥ धन्य धन्य प्रश्नोत्तर । धन्य धन्य ते तरुवर । धन्य ज्ञानदेव अवतार । तिन्ही देव प्रगटले ॥२॥ संत सनकादिक देव । आणि भक्त आले सर्व । स्नानें करुनियां भाव । हरिचरणीं ठेविला ॥३॥ विलाप मांडियेला भक्तीं । खंति करिती त्रिजगतीम । ज्ञानदेवासारिखी मूर्ति । न देखो म्हणती देवराय ॥४॥ देव म्हणती निवृत्ति । तूं प्रत्यक्ष शिवमूर्ति । तारावया क्षितीं । अवतार धरियेला ॥५॥ सोपानें घातलें लोटांगण । मुक्ताया धरिले चरण । संत करिताती स्तवन । पांडुरंगरायाचें ॥६॥ मग संबोखोनियां हरी । सोपानदेवा धरिला करीं । निवृत्ति मस्तकावरी । करकमळ हरि ठेवितसे ॥७॥ नारा विठा पुढें चाले । ऐसे इंद्रायणीस आले । सौंदडीवृक्षातळी बैसले । सपरिवारेम सकळैं भक्त ॥८॥ न्याहाळिती कांसवदृष्टी । ऐसा हरि चालत सृष्टी । नामा होतसे हिंपुटी । ज्ञानदेवाकारणें ॥९॥