भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुसताती संत सांगा देवा मातें । पूर्वीं येथें होतें कोण क्षेत्र

pusatati sant sanga deva maten | purvin yethen hoten kon kshetra

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पुसताती संत सांगा देवा मातें । पूर्वीं येथें होतें कोण क्षेत्र ॥१॥ देव म्हणे स्थळ सिद्ध हें अनादि । येथेंच समाधि ज्ञानदेवा ॥२॥ अष्टात्तरशें वेळां साधिली समाधी । ऐसें हें अनादि ठाव असे ॥३॥ नामा म्हणे देवा सांगितलें उत्तम । ज्ञानांजन सुगम देखों डोळां ॥४॥