भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूर्वीं काय तप नेणें पैं हो केलें । निधान जोडिलें पंढरीचें

purvin kay tap nenen pain ho kelen | nidhan jodilen pandharichen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पूर्वीं काय तप नेणें पैं हो केलें । निधान जोडिलें पंढरीचें ॥१॥ येऊनियां देव दळूं लागे अंगें । रखुमाईचा संग दूर केला ॥२॥ तैसाचि पै संगें येऊनि बाहेरी । वेंचोनियां भरी शेणी अंगें ॥३॥ ओझें झालें म्हणूनि पाठी पितांबरी । घेऊनियां घरीं आणितसे ॥४॥ ऐसें जेथें काम करी चक्रपाणी । तेथें कैंची जनी नामयाची ॥५॥